Kokan: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हृयात दीड महिन्यात, 5 हजार 326 ग्राहकांना नवीन वीजजोडणी

0
49
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हृयात दीड महिन्यात, 5 हजार 326 ग्राहकांना नवीन वीजजोडणी
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हृयात दीड महिन्यात, 5 हजार 326 ग्राहकांना नवीन वीजजोडणी

रत्नागिरी- महावितरणकडून ग्राहकांना जलद गतीने नवीन वीजजोडणी सेवा उपलब्ध करून दिली जाते आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत 5 हजार 326 ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. महावितरणच्या गतिमान सेवेबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-रत्नागिरी-रेल्वे-स्थान/

केंद्र व राज्य शासनाच्या धोरण व योजनांमध्ये नागरीकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचाविण्यासाठी ‘ईज ऑफ लिव्हिंग’ अर्थात जीवन सुलभीकरण या संकल्पनेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा.श्री.लोकेश चंद्र यांनी ‘ईज ऑफ लिव्हिंग’ नूसार ग्राहकाभिमुख प्रशासन राबविताना ग्राहकसेवा गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने मुख्य अभियंता मा.श्री. परेश भागवत दैनंदिन कामकाजाचा आढावा घेऊन कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करीत आहेत.

महावितरणच्या कोकण परिमंडळात रत्नागिरी जिल्ह्यात दीड महिन्यात एकुण 3 हजार 427 ग्राहकांना त्यापैकी चिपळुण विभागात 829, खेड विभागात 856, रत्नागिरी विभागात 1 हजार 742 ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड महिन्यात 1 हजार 899 ग्राहकांना त्यापैकी कणकवली विभागात 981, कुडाळ विभागात 918 ग्राहकांना नवीन वीज जोडणी दिली आहे. अधीक्षक अभियंता श्री. स्वप्नील काटकर (रत्नागिरी), अधीक्षक अभियंता श्री. विनोद पाटील (सिंधुदुर्ग) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी कर्मचारी ग्राहक सेवेसाठी तत्पर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here